नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना तसेच
पावसाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे..जंगलातून पाण्याच्या शोधार्थ हरीणांचा कळप मानवीवस्ती कडे येत असतात.. नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदुळवाडी फाट्यावर भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जागीच ठार झाले.
नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने
नदी, झरे ,नाले कोरडे ठाक पडले आहेत.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरीण व वन्यप्राण्यांना याचा फटका बसला आहे.जंगलातून पाण्याच्या शोधार्थ हरीणांना मानवी वस्तीकडे मोठ्या संख्येने येत आहेत.. नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदुळवाडी फाट्यावर भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा जातीचे हरीण जागीच ठार झाले. अज्ञात वाहनांच्या जोराच्या धडकेमुळे हरणांच्या मानेला, डोक्याला व पायांना गंभीर मार लागला होता.यामध्ये
हरीण जागीच ठार झाले.. या अपघाताची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने हरीण
ताब्यात घेतले..दफनविधी करण्यात आला..