Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

May 5, 2022


वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला भगवान विष्णूंनी परशुराम म्हणून सहावा अवतार घेतला . भगवान परशुराम हे सात चिरंजीवी पुरुषांपैकी एक आहेत आणि हाच श्रीविष्णू चा एक चिरंजीव अवतार आहे असे सांगितले जाते . म्हणूनच सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . मनमाड शहरात देखील आज ०३/०५/२०२२ रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . ह्या निमित्त शहरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . शहरातील महात्मा गांधी चौक येथून ढोल ताशांच्या गजरात , भगवान परशुराम यांची भव्य प्रतिमा असलेला भव्य दिव्य सजवलेला रथ व परशुरामाची पालखी ह्या शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला . मिरवणूक मार्गातील परिसर भगवेमय करण्यात आला होता . तसेच बाल गोपाळानी पौराणिक वेश भूषा सहित भगवे झेंडे घेऊन शोभा यात्रेत सहभाग घेतला . मिरवणूक मार्गावर ठराविक ठिकाणी मसाला ताक व पिण्याचे थंड पाणी वाटप करण्यात आले . अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने शोभा यात्रा ठरलेल्या मार्ग प्रमाणे शांततेत पार पडली . ह्या मध्ये मनमाड शहरातील वेदिका ब्राम्हण महिला मंडळ , परशुराम प्रतिष्ठान मनमाड , ब्राम्हण सेवा संघ , हिंदी भाषिक ब्राम्हण मंडळ , ज्येष्ठ नागरिक , महिला बाल गोपाळ तसेच सकल हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला . स्नेह भोजनाने शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला .
आयोजन परशुराम जन्मोत्सव समितीने केले होते . समितीचे अध्यक्ष कु. सुमेर मिसर यांनी ह्या उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या शहरातील ज्ञात अज्ञात , सर्व मान्यवर , ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले . मनमाड पोलिस स्टेशन चे ही मोलाचे सहकार्य लाभले .

अजून बातम्या वाचा..

शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]