Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव जवळ ऊस तोडणी करून घरी परतणाऱ्या कामगारांच्या ट्रक ला अपघात; लहान मुलांसह अनेक जखमी

May 9, 2022

नांदगाव-औरंगाबाद रोडवर ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात  झाला यात  ट्रक पलटी झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 24 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री घडली. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमाशंकर येथून  ट्रक क्रमांक एम.एच.14 सि यू.205 कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत असताना नांदगाव –औरंगाबाद रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात चालक प्रदिप प्रकाश चव्हाण याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडला.यामध्ये ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात अनिल चव्हाण, विश्वानाथ गिते,विलास वाघ या तिघांना धुळे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नांदगाव ग्रामीण रुग्णालयात रेणुका तांबे, प्रविण पवार, ललित चव्हाण, प्रकाश चव्हाण, सावली चव्हाण, सरला चव्हाण, पुनम चव्हाण, शैली चव्हाण, जयश्री चव्हाण, योगेश चव्हाण, राजाराम चव्हाण, चंद्रकला चव्हाण, सुवर्णा चव्हाण, बैनशी चव्हाण, काजल चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, गोकुळ चव्हाण, लता चव्हाण, सौरभ चव्हाण, तुळशीराम चव्हाण, अमेदी चव्हाण सर्व रहणार (बोढरे ता.चाळीसगाव) ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

जखमींवर तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे, मालेगाव, चाळीसगाव येथे पाठवण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह परिसरातील इतरही खाजगी डॉक्टरांनी देखील यावेळी अपघातातील जखमींवर उपचार करत मदतीचे दर्शन घडले.. याप्रकरणी पोलिसांत अपघाताचा

गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.भुषण अहिरे अधिक तपास करीत आहेत..

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]