दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) ” जागतिक उच्च रक्तदाब दिन ” साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे, ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा !’ या दिवसाचे औचित्य साधून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “जागतिक उच्च रक्तदाब दिवस” निमित्त शहरातील नागरिकांची १३ ते २० मे या सात दिवसात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब चाचणी ( BSL ) ,बॉडी मास इंडेक्स (BMI ) ,फुफुसांची तपासणी (PFT ) करण्यात येणार आहे. याच बरोबर डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे . उच्च रक्तदाब हा वयाप्रमाणे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे.यामुळे पक्षघात ,हृदय विकार आणि किडनी विकार उद्भवू शकतात. जगभरात लोकांना उच्च रक्तदाबाबद्दल जागृतीचा आभाव आहे, किंवा ते अचूक कसे मोजायचे याची माहिती नसते. म्हणून शहरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी नागरिक ८९५६६५२०५६ या क्रमांकावर चौकशी करू शकता.
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव.
मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद...











