loader image
[ays_poll id=7]

भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

May 10, 2022


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे भुसावळ डिवीजन मधील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी भव्य इंटरडीपार्टमेंटल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना वर्कशॉप व या दोन संघांत झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक संजयभाऊ भालेराव संजयभाऊ कटारे,पापा थॉमस कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे संचालक रत्नदीप पगारे, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, पत्रकार अमिन शेख,ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, CRMS कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार,CRMS कारखाना शाखा चे युवा कार्यकर्ते गणेश हाडपे, CRMS ओपन लाईन आनंद गांगुर्डे शाखा ,NRMU नाशिक शाखा चे अनिल दराडे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी केले तर आभारप्रदर्शन कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे यांनी केले.
अंतिम सामना वर्कशॉप अ व मनमाड पॅंथर दोन संघांत झाला.
सदर स्पर्धेमध्ये मनमाड पॅथर प्रथम क्रमांक यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मनमाड वर्कशॉप अ या संघाला देण्यात आला.तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस बी.टी.एस.बॉईजला देण्यात आले.
मनमाड वर्कशॉप अ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.मनमाड पॅंथर संघाने ६ षटकांत ५४ धावा केल्या. मनमाड वर्कशॉप अ संघाने ६षटकात ७बाद ३४धावा केल्या.अंतिम सामना मनमाड पॅंथर जिंकला.
सदर सामना मध्ये सामनावीर व मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार आर.के.सिंग ला देण्यात आले.
अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून संतोष खरे यांना पुरस्कार देण्यात आला.
सदर सामन्याला पंच म्हणून संतोष घुगरे व गजु मेजर यांनी काम केले तर स्कोअर म्हणून सम्राट गरुड व मंगेश जगताप यांनी काम केले तर धावते समालोचन सिध्दार्थ जोगदंड यांनी केले.

सदर स्पर्धेला प्रथम क्रमांक चे बक्षीस ७७७७/-रू पापाभाई थॉमस यांच्या कडून देण्यात आले तर द्वितीय क्रमांक चे बक्षीस ५५५५/- रू संजय भाऊ कटारे यांनी दिले तर तृतीय क्रमांक चे बक्षीस ३३३३/-रू रत्नदीप पगारे यांनी दिले.
अंतिम सामना मधील उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज चे पुरस्कार राजेंद्र जाधव यांच्या कडून देण्यात आले
प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चे स्मृती चिन्ह हे वसंत सोनवणे यांच्या कडून देण्यात आले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, सम्राट गरुड, भिमराव धिवर, वसंत सोनवणे,दिपक बागुल,राजू संसारे,रोहन उबाळे, मंगेश जगताप, संदिप पगारे, किरण वाघ, सुनिल सोनवणे, अर्जुन बागुल, किरण आहीरे, कल्याण धिवर, अजित जगताप, संजय संसारे, अभिमान बोरसे,विजय विसपुते,सतिष झाल्टे राहुल केदारे, आदी प्रयत्नशील होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.