loader image
[ays_poll id=7]

प्रख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

May 10, 2022

संतूर सम्राट म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे. ‘पद्मभूषण’ पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म 1938 मध्ये जम्मूमध्ये झाला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या वडिलांकडूनच गायनाचे धडे गिरवले. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर पोहोचवण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. संतूर हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकवाद्य आहे. संतूर या वाद्याला त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.

बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव- हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने मिळून अनेक चित्रपटांतील गाण्यांना संगीतबद्ध केलं. यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ (1980) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (1985), ‘चांदनी’ (1989), ‘लम्हे’ (1991), ‘डर’ (1993) या चित्रपटांना संगीत दिलं. पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीत आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा याला त्यांनी कायम महत्त्व दिलं. “आपण केवढा मोठा वारसा आणि परंपरा घेऊन जन्माला आलो आहोत याची मुलांना जाण नाही. त्यांच्यामध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागवायचा असेल तर त्याचे धडे शालेय जीवनापासूनच द्यायला हवेत”, असं मत त्यांनी एका कार्यक्रमात मांडलं होतं. “सध्याच्या शिक्षण पद्धतीतील विषय मुलांवर ओझं लादतात. त्यातून बाहेर पडून संगीत हा मन एकाग्र करणारा आणि ताजंतवानं करणार विषय आहे. त्यामुळे मुलांची क्षमता वाढू शकेल. आपल्या कलाकाराला परदेशात पुरस्कार मिळाल्यानंतर तो चांगला असल्याची जाण लोकांना येते. मात्र परदेशी कलाकारांना भारतामध्ये पुरस्कार मिळणं गौरवाचं व्हावं आणि त्यांनी ते डोक्यावर घ्यावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे”, असंदेखील ते म्हणाले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
.