loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सर्व जातीय धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 13, 2022



श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित,मनमाड येथे परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने विवाह संस्कार विभाग आयोजित ‘सर्व जाती धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाभरातून तसेच जिल्ह्याबाहेरील मुला-मुलींनी उपस्थिती लावली. यावेळी असंख्य विवाह इच्छुक मुला-मुलींनी आपले नाव नोंदणी करून परिचय करून दिला याप्रसंगी अनेक विवाह जमण्यास असून ऑनलाईन सेवेद्वारे उपवर मुला-मुलींना अनेक स्थळे दाखविण्यात आले.तत्पूर्वी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या उपस्थितीत तसेच शहरातील प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधी द्वारे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी परभणी,नासिक,सिन्नर नांदगाव,चांदवड,
येवला व मनमाड केंद्रातील सेवेकरी द्वारे नियोजन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.