loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्ह्या किसान सभेचे 15 मे रोजी नांदगावला अधिवेशन !

May 14, 2022



महाराष्ट्र राज्य किसान सभा नाशिक जिल्हा अधिवेशन रविवार १५ मे २०२२ रोजी नांदगाव येथे गुप्ता लान्स येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह ते गुप्ता लान्स पर्यन्त रॅली काढण्यात येणार आहे. अधिवेशन साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड हिरालाल परदेशी(धुळे) उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भाकप किसान सभा राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले हे भूषविणार आहे. अधिवेशनात शेती, शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन निश्चित्त करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात येतील. मागील अधिवेशन नंतर आज पर्यंत जिल्ह्यात झालेल्या विविध आंदोलनांचा आढावा जिल्हासचिव देविदास भोपळे मांडणार आहे. पुढील तीन वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. अधिवेशन स्थळाला दिवंगत नेते किसान सभेचे राज्य अध्यक्ष राहिलेले कॉम्रेड माधवराव गायकवाड नगर नाव देण्यात येणार आहे. तर किसान सभा नांदगाव तालुका माजी अध्यक्ष दिवंगत कॉम्रेड शंकर गंभीरे, व किसान सभा नेते दिवंगत फकिरा पवार प्रवेशद्वार नाव देण्यात येणार आहे. किसान सभा राज्यसरचिटनिस दिवंगत कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचे नाव देण्यात आले आहे.तसेच शिरपूर येथे २८,२९मे २०२२ रोजी राज्य किसान सभेचे राज्य अधिवेशन प्रतिनिधी निवड करण्यात येणार आहे. तरी अधिवेशनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भास्करराव शिंदे, जिल्हा सचिव देविदास भोपळे, जिल्हा संघटक कॉम्रेड विजय दराडे, जिल्हा उपाध्यक्षा ॲड.साधना गायकवाड, ॲड.दत्तात्रय गांगुर्डे,सुखदेव केदारे, नामदेव बोराडे, प्रकाश भावसार, एकनाथ दौंड, जगन माळी, मधुकर मुठाळं, किरण डावखर ,छभु पुरकर, लॅक्समन अहिर, निवृत्ती कसबे, अनिल जिरे, तानाजी बॅंडकुळे आदींनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.