भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मानवी जीवन मूल्य लोकशाही समता स्वातंत्र्य बंधुता आणि आहे राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय एकता व एकात्मता आपल्याच साहित्य शाहिरीतून तहहयात मांडणारे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा आपल्या शाहिरी प्रतिभेने जनमाणसात रुजवणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचा १८ वा स्मृतिदिन
लोकशाहीर दिन म्हणून लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नासिक महाराष्ट्र यांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ९:३० वा.
युट्युब लाईव्ह
https://youtu.be/I-CS26AYvc0
सर्वव्यापी वामनदादा कर्डक ह्या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक योगीराज बागुल,मुंबई यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान चे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा शरद शेजवळ यांनी दिली आहे वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य शा.प्रतापसिंग बोदडे
(कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्थान भूषवणार असून कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्यमिलिंद पगारे हे करणार आहेत तर स्नेहल सोनटक्के सूत्रसंचालन करणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान चे सर्व सन्माननीय सदस्य व संयोजन समिती प्रयत्नशील असल्याची माहिती निमंत्रक प्रा.शरद शेजवळ यांनी दिली आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











