राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे ने अपशब्द उच्चारले तसेच निखील भामरे याने त्याचे समर्थन केले हे सर्व कृत्य अतिशय निंदनिय असून यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून प्रशासनाने त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा मा.छगन रावजी भुजबळ यांच्या आदेशाने व मा.आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन मा.पोलीस निरीक्षक, मनमाड शहर पोलिस स्टेशन यांना देऊन तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष दीपक गोगड, से.द.जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,अ. स. तालुकाध्यक्ष हबीब शेख,महिला अध्यक्षा अपर्णाताई देशमुख,
मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक,
युवक ता.संघटक अमोल गांगुर्डे, युवती अध्यक्षा डॉली निकाळे,
युवक कार्याध्यक्ष अरविंद काळे,योगेश(बाळासाहेब)जाधव,
बाबा पठाण,नितीन वाघमारे,
सुफियांन मिर्झा,अक्षय देशमुख. हे उपस्थित होते.













