संविधानाला अभिप्रेत असलेली मानवी जीवन मूल्य लोकशाही समता स्वातंत्र्य बंधुता राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय एकता व एकात्मता आपल्या साहित्य शाहिरीतून तहहयात मांडणारे आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा आपल्या शाहिरी प्रतिभेने जनमाणसात रुजवणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचा १८ वा स्मृतिदिन
लोकशाहीर दिन म्हणून लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नासिक महाराष्ट्र यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
सर्वव्यापी वामनदादा कर्डक ह्या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक योगीराज बागुल,मुंबई यांचे जाहीर व्याख्यानात बोलतांना बागुल यांनी कर्डकांच्या साहित्यिक व खाजगी जीवनाच्या अनेक पैलूंवर भाष्य केले.
वामनदादा कर्डक यांचे साहित्य केवळ बुद्ध आंबेडकरी विचार सांगत नाही तर समग्र मानवी ती आणि परिवर्तनाचा विचार हा आंबेडकरी वैचारिक सिद्धांत घेऊनच वामनदादा कर्डक यांनी आपल्या साहित्यातून लोकजागर केला भारतातील कामगार शेतकरी शेतमजूर कष्टकरी स्त्रिया माता-भगिनी यांच्या व्यथा-वेदना वामन दादांनी आपल्या साहित्यातून मांडल्याचे सांगून बाबासाहेबांचा वैचारिक आणि सैद्धांतिक वारसा वामन दादांनी कशा पद्धतीने आपल्या शाहीरी प्रबोधन कार्यातून केला त्याची अनेक उदाहरणे देत योगीराज बागुल वामनदादा नदीचे साहित्यिक आणि मानवतावादी साहित्यविचार यावेळी उलगडून दाखवला
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान चे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठान करत असलेल्या लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्ष या अंतर्गत संविधान शाहिरी वर्षातील उपक्रमांची माहिती देऊन महाराष्ट्र शासनाने वामनदादा कर्डक यांचे समग्र साहित्य संकलित करून लोकार्पण करावे असे आव्हान केले व शालेय अभ्यासक्रमात तसेच विद्यापीठ स्तरावरील स्पर्धकांच साहित्य अभ्यासले जावे पाठ्यक्रमात त्यांच्या साहित्य कविता अंतर्भूत कराव्यात व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात वामनदादा कर्डक यांची स्थापना करून त्यांच्या विचार-कार्याचे बळकटी द्यावी व वामनदादा यांचे संविधान एक विचार मूल्य भावी पिढी नोंदवावे असे आव्हान शरद शेजवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले वामनदादा यांचे पट्टशिष्य शा.प्रतापसिंग बोदडे अध्यक्षस्थानी होते तांत्रिक सहाय्यमिलिंद पगारे यांनी केले तर स्नेहल सोनटक्के सूत्रसंचालन केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान चे सर्व सन्माननीय सदस्य व संयोजन समिती प्रयत्नशील होते












