loader image

आनंद सेवाकेंद्राचा “रक्त संघटक’ पुरस्कार ने गौरव

May 16, 2022


मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून १६ वर्ष अविरतपणे रुग्ण सेवे चे कार्य करणाऱ्या आनंद सेवा केंद्र या रुग्ण सेवाभावी संस्थेला यंदाचा (२०२२) अर्पण रक्तपेढी नासिक द्वारे दिला जाणारा रक्तदान क्षेत्रातील नामांकित “रक्त संघटक” या पुरस्काराने गौरविण्यात आले. रक्तदान क्षेत्रातील सातत्याने अतुलनीय निस्वार्थी कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.मनमाड शहरात आरोग्य व रुग्ण सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा ची ही निवड मनमाड शहराला अभिमानास्पद आहे. सन २००६ साली आरोग्य सेवेसाठी स्थापन झालेल्या आनंद सेवा केंद्रा तर्फे सन २००८ साला पासून सलग १४ वर्ष भगवान महावीर यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या १४ वर्षात या शिबिराच्या माध्यमातून आनंद सेवा केंद्रा ने २००० पेक्षा ही जास्त रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. संपूर्ण विश्वा वर आलेल्या महाभयंकर कोविड -१९च्या संकट काळात सन २०२० मध्ये १६५, सन २०२१ मध्ये १५४ तर यंदा १७१ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आणि गत १४ वर्षात आनंद सेवा केंद्रा च्या माध्यमातून हजारो रुग्णांना अति तातडी काळात ही रक्तदान संबंधित विशेष मदत करण्यात आली. अर्पण रक्तपेढी तर्फे नासिक येथील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल मध्ये आयोजित विशेष कार्यक्रमा मध्ये अर्पण रक्तपेढी चे सर्वोसर्वा प्रमुख नंदकिशोरजी ताथेड आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या मुंबई क्षेत्र प्रमुख श्रीमती सुनीताजी बोरा या मान्यवरांच्या हस्ते रक्त संघटक स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन हा गौरव करण्यात आला. आनंद सेवा केंद्रा च्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी,दीपक शर्मा, ललित धांदल,विनय सोनवणे,चेतन संकलेचा, नितिन अहिरराव, अमोल देव, संजय गांधी,अनुप पांडे, प्रमोद भाबड यांनी स्वीकारला ह्या पुरस्कार चे खरे मानकरी आनंद सेवा केंद्रा च्या रक्तदान चळवळीत नियमितपणे रक्तदान करणारे रक्तदाते च आहेत म्हणून हा पुरस्कार त्या निस्वार्थी रक्तदात्या ना समर्पित असून सर्वाच्या सहकार्य ने हा रुग्ण सेवेचा यज्ञ पुढे ही सुरु राहील असे याप्रसंगी कल्पेश बेदमुथा यांनी सांगितले. ह्या पुरस्कारामुळे आनंद सेवा केंद्राचे चे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.