loader image
[ays_poll id=7]

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या तरुणाचा पाच महिन्यानंतर मृत्यू

May 18, 2022


मनमाड शहरापासून जवळच असलेल्या बेजगाव येथे कुत्र्याने चावा घेतलेल्या एका तरुणाचा तब्बल पाच महिन्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुष्पराज हा तो एकुलता एक मुलगा होता.याबाबत अधिक माहिती अशी की बेजगाव लहाने वस्तीवरील येथील पुष्पराज दादाभाऊ लहाने(वय,१९) यास गेल्या पाच,सहा महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता.त्यानंतर त्याने तीन पैकी दोन इंजेक्शन घेतले होते तर एक घेतल्याचे राहून गेले होते.परंतु तो बरा ही झाला होता.असे बोलले जात आहे.मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने त्यास मनमाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी नाशिक येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.मात्र दोन दिवस उपचार सुरू असतानाच काल सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.