loader image
[ays_poll id=7]

औरंगाबादची तोफ ठरली ‘भारतातील सर्वात लहान तोफ’.

May 19, 2022



औरंगाबादेतील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील लहान तोफेची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नुकतीच करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातून आलेले विठ्ठल गोरे यांचा ‘शिव कृष्णा इंडस्ट्रीज’ नावाने मशिनरी बनवण्याचा कारखाना आहे. सोबतच त्यांना ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे बनवण्याचा छंद आहे. या छंदातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी अलिकडेच एक अत्यंत लहान पितळी तोफ बनवली होती. तिची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तसं सर्टिफिकेट विठ्ठल गोरे यांना नुकतंच प्राप्त झालं. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एका सूक्ष्म तोफेची भर टाकून त्यांनी शहराचा मान आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बनवलेली तोफ ही भारतातील सर्वात लहान तोफ आहे. तीची लांबी 5 मिलीमीटर असून उंची केवळ 2.7 मिलीमीटर आहे. वजन केवळ 140 मिलिग्रॅम आहे. ही तोफ अस्सल तोफेप्रमाणे उडवताही येऊ शकते.
गडकिल्ले भ्रमंतीसोबतच मोडिलिपी, ब्राम्ही लिपी आशा जुन्या लिपींचाही प्रसार करण्यासाठीही विठ्ठल गोरे यांचं मोलाचं योगदान आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.