loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 16 संघाची एस जी सी ए नाशिक अंडर 16 क्रिकेट संघावर विजय. वेदांत वाल्मिक कांदळकर सामनावीर तर अंशुमान अविनाश सरोदे सर्वोत्कृष्ठ फलंदाज

May 20, 2022

गुरुवार दि. १९ मे रोजी नाशिक येथे १६ वर्षातंर्गत झालेल्या हाकीम ट्रोफी स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द एस जी सी ए नाशिक अंडर १६ या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने ५ गडी राखत विजय प्राप्त केला. ४५ षटकांच्या या सामन्यामध्ये मनमाड संघाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचे ठरवले. एस जी सी ए नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना २८.२ षटकांत सर्वबाद १५० धावा केल्या.या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ३२.५ षटकात हा सामना ५ गडी गमवत सहजरित्या जिंकला. सामण्यात सर्वाधिक धावा करणारा मनमाड संघाचा फलंदाज अंशुमान अविनाश सरोदे ( ६० नाबाद धावा , ७२ चेंडु , ८ चौकार ) हा सर्वोत्कृष्ठ फलंदाज ठरला तसेच अष्टपैलु कामगीरी करणारा वेदांत वाल्मिक कांदळकर ( ७ षटक, ३४ धावा ४बळी व फलंदाजी मध्ये ३७धावा , ७ चौकार ) हा सामनावीर ठरला. गोलंदाजी मध्ये भुमी संघातील रुषी कैलास शर्मा यानेही ७षटकात ३२ धावा देत ४ बळी मिळवले.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ रोकडे यांचे खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.
भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे मार्गदर्शक राजाभाऊ पगारे , परवेज शेख , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , कौशल शर्मा , शुभम गायकवाड , नितीन आहिरराव , सनी अरोरा सर , रोहित पवार व इतर मनमाड मधील खेळाडुवर्गांने या खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.