बेजगाव तालुका नांदगाव येथील आदिवासी कुटुंबीय दत्तू रावसाहेब सोनवणे व सौ अर्चना दत्तू सोनवणे यांच्या कोपी ला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व संसार उपयोगी वस्तूंचे जळून खाक झाले होते, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या कुटुंबियांना संपूर्ण गृह उपयोगी वस्तू देऊन धीर दिला.
आज शुक्रवार रोजी आमदार निवास येथे सदर कुटुंबियांना संसार उपयोगी वस्तू यामध्ये सर्व प्रकारचे भांडे 50 किलो गहू 50 किलो तांदूळ कुकर गॅस तसेच लहान मुलांना कपडे व पती पत्नी यांना कपडे आमदारांनी दिले .
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे गुलाब भाबड अमोल नावंदर, संघटक भाऊराव बागुल, बिजगाव सरपंच किशोर लहाने पोलीस पाटील प्रवीण काकड सदस्य दादा भाऊ सोनवणे विकास सानप उपस्थित होते
मनमाड नगर परिषदेतील विविध कामगार संघटनांचा कामबंद आंदोलनात सहभाग
महाराष्ट्रातील नगर परिषद ,नगरपंचायत कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात विविध निवेदन देऊन आंदोलन करुन...











