Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्र सरकारचा कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल : मनमाड मध्ये जैन समाजाने मोर्चा काढत केला निषेध

May 23, 2022

संपूर्ण विश्वाला अहिंसा, शुद्ध शाकाहार आणि जियो और जिने दो चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर स्वामींच्या शिकवण आणि धर्माचे तंतोतंत पालन करणाऱ्या जैन समाजा विषयी केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग, कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -५ च्या अहवालात जैन धर्मीयांच्या श्रद्धेला,भावनेला आघात पोहचविणारा अहवाल या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे ह्या अहवालाचा मनमाड शहर सकल जैन समाज तसेच जैन बांधवांनी तीव्र निषेध करून मूक मोर्चा काढून केंद्र सरकार प्रती आपली नाराजी व्यक्त केली. जैन समाज आणि जैन समाजाचाच्या सिद्धांताची केंद्र सरकार मधील अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी प्रशंसा केलेली आहे ह्याचा सुद्धा विसर केंद्र सरकारला पडला की काय असा प्रश्न जैन समाजाने उपस्थित केला आहे. अल्पसंख्यांक असलेला जैन समाजबद्दल केंद्र सरकारने जाहीर केलेला अहवालच मुळात चुकीचा असून प्रसिद्ध करण्यापूर्वी सरकारने त्याचे अवलोकन करणे गरजेचे होते असेही जैन समाजाचे म्हणणे आहे.जैन समाजाच्या भावनेशी,श्रद्धेशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारच्या अहवालाचा तीव्र शब्दात मनमाड च्या जैन बांधवांनी निषेध केला आहे.ह्या मूक मोर्चाची सांगता तलाठी कार्यालय येथे मंडल अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. या मोर्चात संघपती रिखबचंद ललवाणी,संजय ललवाणी,कल्याणचंद ललवाणी,पियूष सुराणा, डॉ.प्रवीण शिंगी,दीपक मुनोत,पारस बरडीया,बुरड सर,सुनील भंडारी,अनिल भंडारी, राकेश ललवाणी,उमेश ललवाणी,रमेश हिरण,बाळू हीरण, नेमीचंद लोढा,कल्पेश बेदमुथा,सुभाष नहार,अनिल गुंदेचा,अनुप बेदमुथा,देवानंद शाह,परेश राका, मानकशेठ गांधी,सुभाष संकलेचा, पोपटलालजी बेदमुथा, विपीन ओस्तवाल,पाटणी, श्रीश्रीमाळ, मनोज बाफना, बुरड, साहेबचंद बेदमुथा,मनोज छाबडा,दिलीप शाह,देवानंद शाह आदीसह मोठ्या प्रमाणात जैन बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]