loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

May 26, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांचा शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा प्राचार्य डॉ.ए.व्हि. पाटील यांच्या अध्यक्षतेत व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.जे.वाय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड नगरपरिषद चे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. सचिन कुमार पटेल व मनमाड उपविभागीय पाेलिस अधीक्षक समीर सिंह साळवे होते. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय पातळीवर तसेच विद्यापीठ स्तरावर खेळलेले खेळाडू, विविध अभ्यासक्रमात प्रथम व द्वितीय आलेले गुणवंत विद्यार्थी,एनसीसीचे उत्कृष्ट कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच शैक्षणिक, संशोधन व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पारितोषिक वितरणाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन प्रेरणा देणारा असतो तसेच आयुष्यात मिळणारे फळ इच्छाशक्तीशिवाय मिळत नाही असे मत मनोगत व्यक्त करताना उपविभागीय पाेलिस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी केले. मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांनी आपल्या मनोगतातून वेळेचा पूर्ण सदुपयोग करा, यश मिळवण्यासाठी मेहनत, आशीर्वाद, धडाडी व ध्येयनिश्चिती आवश्यक असते असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ ए व्हि पाटील यांनी एकदा मिळालेले पारितोषिक शेवटचे नसावे यानंतर पुढची पारितोषिक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे असे सांगितले. यावेळी मनमाड नगरपरिषदेचे अशोक पाईक, पत्रकार अमोल खरे, उपप्राचार्य डॉ पी जी आंबेकर, पर्यवेक्षक डॉ सतीश तांबे, कुलसचिव समाधान केदारे, विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षराणी पेढेकर व डॉ.गणेश गांगुर्डे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ आरती छाजेड व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ पी जी आंबेकर यांनी केले


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.