२५ मे ते २९ मे दरम्यान शिवसेना पक्षातर्फे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात खासदार अरविंद सावंत तसेच शिवसेना उपनेते, म्हाडा चे अध्यक्ष विनोदजी घोसाळकर हे शिवसंपर्क अभियानाचे नेतृत्व करत असून येत्या काळातील निवडणुकात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून तयारीला लागावे व शिवसेनेचे विचार तसेच ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय घराघरापर्यंत पोहोचवावेत हा या मोहिमेचा उद्देश आहे.
शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय, मनमाड येथे शिवसंपर्क अभियान मेळावा आयोजित करण्यात आला असून
याप्रसंगी शिवसेना उपनेते विनोदजी घोसाळकर, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पक्ष निरीक्षक अनिल डेरे,वैभव सावंत तसेच नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे उपस्थित राहणार आहे
या मेळाव्याला मनमाड शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिकांनी या वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले आहे.












