नांदगाव साकोरा रोडवर मंगळवारी सायंकाळी पल्सर मोटारसायकलवरून येवून महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून घेवून जातांना तरूणांनी त्यांचा पाठलाग करून तीन चोरट्यांना चोप देवून पोलिस ठाण्यात जेरबंद केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी,
घरफोडी,सोने तसेच पाळीव जनावरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील शांती बाग, सुयोग काॅलणी येथे भरदिवसा घरफोडी, तसेच साकोरा, चांदोरा आदि भागातून बैलजोडी, गायी, तसेच कांदे विकून घरी परतणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना रस्त्यात गाठून पैशाची लूटमार झाली आहे. मात्र शोध लागत नसल्याने कोणीही पोलिसांत तक्रार दाखल करत नसल्याचे उपस्थित नागरिकांनी यावेळी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी साकोरा येथील प्रतिष्टीत व्यापारी धरमचंद कासलीवाला यांच्या पत्नी सौ. लता धरमचंद कासलीवाल व सुन सायली कासलीवाल नातू विवान या एका मोटारसायकलवरून नांदगाव येथून साकोरा येथे घरी जात असतांना मोरखडी बंधारानजिक रस्त्याचे काम चालू असल्याचा फायदा घेत अचानक मागून एका पल्सर गाडीवरून तिघांनी येवून चालू गाडीवरील सायलीच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.मात्र लगेच सासू लता कासलीवाल यांचे गळ्यातील तीन तोळ्याची पोत खेचून पळ काढला.मात्र सदर प्रकार मागून साकोरा येथील काही तरूण मोटारसायकल वरून येत होते. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग करून साकोरा येथील काही तरुणांना सोबत घेत चांदोरा गावातील मित्रांना फोन करून सदर प्रकार सांगितला व दोन्ही गावांतील तरूणांनी पाठलाग करून त्यांना पकडून चांगलाच चोप देवून समाजमंदिरात कोंडून ठेवले व विचारपूस करून चोरलेल्या सोन्याच्या पोतीचा तपास केला मात्र ते फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचेजवळ चाॅपर व कटर आढळून आले. येथील नागरिकांनी दुरध्वनी वरुन संपर्क साधून तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
रोहीदास कचरू पानसरे, रविंद्र वाल्मिक चव्हाण ,योगेश रमेश डेंबरे (म्हसोबा नगर ,रा. कोपरगाव) यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वाघमारे,पो.ह.राजु मोरे,पो.ना. अनिल शेरेकर,कु-हाडे, पो.शि. कोकाटे मॅडम हे तपास करीत आहेत.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











