Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची पोत ओरबाडणाऱ्या कोपरगावच्या चोरट्यांना अटक : परिसरातील तरुणांची समयसूचकता

May 26, 2022

नांदगाव साकोरा रोडवर मंगळवारी सायंकाळी पल्सर मोटारसायकलवरून येवून महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून घेवून जातांना तरूणांनी   त्यांचा पाठलाग करून तीन चोरट्यांना चोप देवून   पोलिस ठाण्यात जेरबंद केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी,
घरफोडी,सोने तसेच पाळीव जनावरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे  आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील शांती बाग, सुयोग काॅलणी येथे भरदिवसा घरफोडी,  तसेच साकोरा, चांदोरा आदि भागातून बैलजोडी, गायी, तसेच कांदे विकून घरी परतणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना रस्त्यात गाठून पैशाची लूटमार झाली आहे. मात्र शोध लागत नसल्याने कोणीही पोलिसांत तक्रार दाखल करत नसल्याचे उपस्थित नागरिकांनी यावेळी सांगितले.                         
मंगळवारी सायंकाळी साकोरा येथील प्रतिष्टीत व्यापारी धरमचंद कासलीवाला यांच्या पत्नी सौ. लता धरमचंद कासलीवाल व सुन सायली कासलीवाल नातू विवान या एका मोटारसायकलवरून नांदगाव येथून साकोरा येथे घरी जात असतांना मोरखडी बंधारानजिक रस्त्याचे काम चालू असल्याचा फायदा घेत अचानक मागून एका पल्सर गाडीवरून तिघांनी येवून चालू गाडीवरील सायलीच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाण्याचा  अयशस्वी प्रयत्न केला.मात्र लगेच सासू लता कासलीवाल यांचे गळ्यातील तीन तोळ्याची पोत खेचून पळ काढला.मात्र सदर प्रकार  मागून साकोरा येथील काही तरूण मोटारसायकल वरून येत होते. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग करून साकोरा येथील काही तरुणांना सोबत घेत  चांदोरा गावातील मित्रांना  फोन करून सदर प्रकार  सांगितला व दोन्ही गावांतील  तरूणांनी  पाठलाग करून त्यांना पकडून  चांगलाच चोप देवून समाजमंदिरात कोंडून ठेवले व विचारपूस करून चोरलेल्या सोन्याच्या पोतीचा तपास केला मात्र ते फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचेजवळ चाॅपर व कटर आढळून आले. येथील नागरिकांनी दुरध्वनी वरुन संपर्क साधून तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
रोहीदास कचरू पानसरे, रविंद्र वाल्मिक चव्हाण ,योगेश रमेश डेंबरे (म्हसोबा नगर ,रा. कोपरगाव) यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वाघमारे,पो.ह.राजु मोरे,पो.ना. अनिल शेरेकर,कु-हाडे, पो.शि. कोकाटे मॅडम हे तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]