loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील  जळगांव बु ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक किरण घुगे यांची अखेर बदली

May 27, 2022


याबाबत वृत असे की तालुक्यातील जळगाव बु॥ येथील ग्रामसेवक किरण घुगे यांच्याविरूध्द स्थानीक ग्रामपंचायत सदस्यानीं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती .तक्रारीच्या मुदयावर ग्रामसेवक किरण घुगे याची बदली केली पंरतू नविन ग्रामसेवकाची नियूक्ती केली नसून त्याचा पदभार कुणाकडे ही सोपविलेला नसुन पंचायत समिती प्रशासनाची याबाबत बोटचेपी भूमिका दिसत असून ग्रामसेवक व सरपंच यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला असून त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे. 
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, जळगांव बु येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. किरण घुगे हे जळगांव बु ग्रामपंयातीमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून उपस्थित नाहीत. सदरच्या काळात त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका घेतलेल्या नाहीत. आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना कोणताही मिटींग अजेंडा नाही. सदरचे ग्रामसेवक हे अतिषय मनमानी पद्धतीने कारभार करत असून ते निरक्षर सरपंचाचा गैरफायदा घेत आहेत. कोणतेही कामे हे मिटींगवर न घेता परस्पर मंजूर केली जातात. आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे केली जात आहेत. प्रोसिडींग बुक वर काही निरक्षर ग्रामपंचायत सदस्यांचे बोगस अंगठे मारले जात असून त्याचीही चौकशी करणेत यावी. ग्रामसेवक यांचे संपूर्ण ग्रामपंचायत दप्तराची तपासणी करण्यात यावी. त्यात प्रोसिडींग बुक , अजेंडा फाईल , कॅश बुक तसेच इतर सर्वच कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. सदर ग्रामसेवकाने कर स्वरूपात वसुल केलेल्या रकमांचाही अपहार केले असण्याची शक्यता असून बोगस खर्च दाखविलेला असण्याची शक्यता आहे. तरी जळगांव बु ग्रामपंचायतीची संपूर्ण चौकशी होवून कारवाई करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
तसेच 14 व्या वित्त आयोगातून कचराकुंडी खरेदी (एक लाख रूपये) , ई-लर्निंग साहित्य खरेदी (एक लाख सत्यान्नव हजार रूपये ) . इत्यादी खरेदी केल्याचे दाखवून प्रत्यक्षात गावात कुठलेच साहित्य उपलब्ध नाही. तसेच पाणीपुरवठा योजनेवर लाखो रूपयांची उधळपट्टी करूनही पाणीपुरवठा सुरळीत नाही. तसेच 14 व्या वित्त आयोगातून केलेले रस्ता कॉंक्रीटीकरण व इतर कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची शक्यता असून चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे. तक्रारी अर्जावर ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा सांगळे , सविता साठे , दिपाली डिघोळे , उषा आव्हाड , पुंजाबाई मेंगाळ यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.