loader image
[ays_poll id=7]

लडाख मध्ये २६ जवांनांना घेवून जाणाऱ्या लष्कराचे वाहन नदीत कोसळले ; ७ जवान शहीद, अनेक जखमी

May 27, 2022

आज सकाळी लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये एका लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल 7 जवान शहीद; तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

लष्कराच्या माहितीनुसार, लष्कराचे 26 जवान शुक्रवारी सकाळी परतापूरहून हनीफ सब सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टकडे जात होते. पण, रस्त्यातच त्यांचे वाहन श्योक नदीत कोसळले. थोइसे येथून 25 किमी अंतरावर हा अपघात घडला. त्यानंतर सर्वच जवानांना लगतच्या आर्मी फिल्ड रुग्णालयात हलवण्यात आले. पण, तिथे उपचारादरम्यान 7 जवानांचा मृत्यू झाला. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीसाठी लेह येथून तज्ज्ञांचे एक पथक परतापूरला पाठवण्यात आले असून गंभीर जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.