loader image
[ays_poll id=7]

परशुराम प्रतिष्ठान व सावरकर प्रेमी जनतेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

May 28, 2022


शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी मनमाड शहरातील चिंतामणी मंगल कार्यालय येथे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड व समस्त सावरकरप्रेमी जनतेततर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून तसेच सामूहिक जयोस्तुते गायन करून साजरी करण्यात आली. यावेळी कुमारी श्रावणी पुरंदरे हिने दिपप्रज्वलन तसेच उपस्थित बाळगोपाळांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. चि.पार्थ गंगेले याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर हिंदीतून कविता सादर केली.चि.वेदांत जोशी याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तृत्व सादर केले तसेच यावेळी दैनिक तरुण भारतचा कालजीय सावरकर या विशेषांकाचे प्रकाशन सौ वैष्णवी पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच त्याविषयी श्री रमाकांत मंत्री यांनी अंकाविषयी सर्वांना माहिती दिली. श्री विजय पुरंदरे, श्री प्रकाश गाडगीळ सर, श्री युवराज बळेल व वेदिका ब्राह्मण महिला मंडळ तसेच समस्त सावरकर प्रेमी उपस्थित होते जयोस्तुते या स्वतंत्रतेच्या स्तोत्र गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.