loader image
[ays_poll id=7]

प.स.कार्यालयात तालुका सरपंच संसद संपन्न

May 28, 2022


नांदगाव पंचायत समिती कार्यालयात एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट ‘अंतर्गत स्थापित एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद’ व महाराष्ट्र शासन नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नांदगाव तालुका सरपंच संसदे चे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी प्रास्तविक केले. सहसमन्वयक प्रकाश  महाले यांनी प्रारंभी प्रमुख वक्ते व सरपंचांचे स्वागत केले. तालुका समन्वयक देविदास मार्तंड, तालुका संघटक  हेमंत सानप व तालुका सहसमन्वयक सुधाकर पगार,  पंचायत समिती चे विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे,विजय ढवळे  हे व्यासपीठावर होते.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच संसदेस प्रारंभ करण्यात आला.न्यायडोंगरीचे उपसरपंच अमोल आहेर,बोराळे च्या सरपंच अश्विनी राजु पवार, गंगाधरी चे सरपंच सचिन जेजूरकर, सुधाकर पवार, कळमदरी ग्रामपंचायत सदस्य विलास पगार व कासारी चे सरपंच हेमंत सानप यांनी या सरपंच संसदेत नांदगाव तालुक्यातील ग्रामविकास व महसूल विषयक असणाऱ्या विविध, ज्वलंत व प्रातिनिधिक समस्यांचा पाढाच वाचला. ग्रामपंचायत कार्यालयात काम करताना अनंत  अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सरपंचांनी बोलताना सांगितले. यामध्ये प्रामुख्याने नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. पाण्याची पातळीमध्ये घट होत आहे.महसूल विभागाने तातडीने कारवाई करण्यात यावी, पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत. पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नायब तहसीलदार नरेंद्र  वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर यांनी या संसदेत सरपंचांनी प्रातिनिधिक स्वरूपात सादर केलेल्या नांदगाव तालुक्यातील ज्वलंत ग्रामविकासविषयक समस्यांचे निराकरण करून शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विठ्ठल पगार,संयोग निकम ,राजेश निकम,बाळासाहेब आव्हाड,नितीन शेरेकर, किसन वाघमोडे, राजु पवार,रिकेंश जाधव,पंढरीनाथ वरपे विश्वनाथ कांदे यांच्यासह नांदगाव तालुक्यातील सरपंच व उपसरपंच मोठया संख्येने या संसदेसाठी उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर देविदास मार्तंड यांनी आभार मानले.राष्ट्रगीताने  सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.