loader image
[ays_poll id=7]

निष्ठावंत भाजपा पदाधिकारी नीळकंठ त्रिभुवन यांचे कन्येच्या विवाह प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांची उपस्थिती

May 29, 2022


मनमाड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद ओम मित्र मंडळ आणि नंतर भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून 1986 पासून सामाजिक घार्मिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत प्रामाणिक पणे ३६ वर्ष निस्वार्थी कार्य करणारे १९९२ साली अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग घेणारे मनमाड भाजपा चे जेष्ठ मार्गदर्शक निळकंठ त्रिभुवन यांची जेष्ठ कन्या चि सौ का रोहिणी हिचा शुभमंगल विवाह अंदरसुल ता येवला चि विशाल दिलिप पुंड यांचेशी नुकताच संपन्न झाला या विवाह चे वैशिष्ट्य म्हणजे या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगीं वधू वरास शुभ आशीर्वाद व शुभेच्छा देणे साठी दिंडोरी लोकसभा क्षेत्राच्या खासदार आणि भाजपा च्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ सौ भारती प्रवीण पवार यां उपस्थित होत्या या विवाह ची कोणतीही निमंत्रण पत्रिका छापलेली नव्हती मात्र भाजपा च्या निष्ठावंत कार्यकर्ते च्या आदरपूर्वक विनंती ला केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी तेव्हढ्याच आदराने प्रतिसाद देत आयुष्य भर विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या नीलकंठ त्रिभुवन यांचा सन्मान करीत या शुभ कार्यात उपस्थिती लावली भाजपा च्या नेतृत्वाची संघटने मध्ये निष्ठेने कार्य करणाऱ्या सर्व साधारण कार्यकर्त्यां शी जोडलेली नाळ हा संपूर्ण मनमाड शहरात अत्यंत कौतुक चा व चर्चेचा विषय ठरला या प्रसंगी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, डॉ उमेश काळे भाजपा शहर सरचिटणीस नितीन परदेशी एकनाथ बोडखे दिलिप पुंड, सौ शारदा पुंड सौ कमल त्रिभुवन ,शिवाजी पाटील दीपक शिंदे किरण त्रिभुवन या मान्यवरां सह मनमाड शहरातील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.