loader image
[ays_poll id=7]

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा : विनोद घोसाळकर

May 29, 2022


शिवसंपर्क अभियान अंतर्गत शनिवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला
आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन शिवसेनेचे विचार व ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय जनते पर्यंत पोहोचावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत शनिवारी
झालेल्या मेळाव्यात शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्यांच्यासोबत पक्ष निरीक्षक वैभव सावंत नाशिक जिल्हा प्रमुख सुनील पाटील, युवा सेनेचे निलेश गवळी,मनोज परदेसी,श्री.कुरेशी हे उपस्थित होते.
या मेळाव्याप्रसंगी बोलताना विनोद घोसाळकर यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे कार्य अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालू असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांचे धडाकेबाज कार्य व जनतेतील वाढती लोकप्रियता पाहता आता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची संख्या वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे आणि मातोश्रीची ताकत वाढवावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आपल्या भाषणात नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला आमदार केले असल्याची सदैव जाणीव ठेवत असल्याचे सांगितले, मतदारसंघासाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध समाजहिताच्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा 100% फडकवण्याचे विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी बोलताना पक्ष निरीक्षक वैभव सावंत यांनी गेल्या तीन दिवसांमध्ये घेतलेल्या अनेक भेटीगाठी मध्ये आमदार सुहास आण्णा कांदे यांचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेले काम हे उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले.
शिवसंपर्क अभियान मेळाव्यास मतदारसंघातील शिवसेना, युवासेना,युवती सेना,महीला आघाडी, आजी माजी पदाधिकारी, सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.