loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथील कवी काशिनाथ गवळी यांची नाशिक जिल्हा साहित्यकणा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदी निवड

May 30, 2022



नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये साहित्यकणा फाउंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या साहित्य संमेलनात संस्थेचे अध्यक्ष मा. संजय गोराडे व सचिव मा. विलास पंचभाई यांनी कवी काशिनाथ गवळी यांची साहित्यकणा फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी व सुरेश चौरे यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले. संमेलनाध्यक्ष राजनजी लाखे, संजय वाघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कवी काशिनाथ गवळी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून ही निवड केल्याचे सचिव विलास पंचभाई यांनी सांगितले. संस्थेचा प्रचार, प्रसार व नावारूपास आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कवी काशिनाथ गवळी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल प्रा. सुरेश नारायणे यांनी त्यांचे अभिनंदन केले . तसेच साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.