loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये श्री शनी देव जयंती उत्साहात साजरी

May 30, 2022


ज्येष्ठ महिन्यातील अमावस्थेला शनि जयंती असते. याच दिवशी शनि देवाचा जन्म झाला असे म्हणतात. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ देतात. हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय शनिदेव घेतात . कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहू शकत नाही. शनिची साडेसाती अथवा ढय्या असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते असे म्हणतात. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी आणि शनी जयंतीच्या दिवशी श्री शनि देवाची मनोभावे पूजा करतात.

शहरामध्ये श्री शनी देव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मंदिर आणि श्री शनी मंदिर सकाळी महाअभिषेक पुजा , दुपारी 12-00 वाजता महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले , सायंकाळी आठवडे बाजार येथील श्री शनी महाराज मंदिर येथे महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आज संपुर्ण दिवस शहरातील भाविक श्री शनी मंदिर येथे दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.