loader image
[ays_poll id=7]

पेट्रोल पंप चालकांचा “नो पर्चेस डे” यशस्वी : असोसिएशन चा दावा

May 31, 2022

मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन व फामपेडा या राज्य संघटनेने संपुर्ण महाराष्ट्रात खरेदी बंद आंदोलन हे पेट्रोलियम कंपनी व शासनाचे मनमानी धोरण विरुद्ध पुकारलेले होते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे 400 डीलर यांनी यात सहभाग नोंदवत आज पेट्रोल व डिझेल ची खरेदी पेट्रोलियम कंपनी कडून केलेली नसून सदर आंदोलन हे 80% यशस्वी झालेले आहे. त्याचप्रमाणे नाशिक,धुळे व नंदूरबार येथील सुमारे 200 डीलर हे आज सकाळी 9.00 वाजेपासून मनमाड ,पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन चे डेपो समोर जमून लक्षवेधी निदर्शन केले त्यात प्रामुख्याने 2017 पासून पेट्रोलियम डीलर चे कमिशन मध्ये वाढ तातडीने करण्याची मागणी केली आहे, तसेच विस्कळीत झालेला इंधनाचा पुरवठा हा तातडीने सुरळीत करण्याची मागणी आहे तसेच दिनांक 4 नोव्हेंबर 2021 व 21 मे 2022 रोजी केंद्र शासनाने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सुमारे 10 ते 12 रुपये कमी केलेत परंतु हा निर्णय घेताना पेट्रोलियम डीलर चे होणाऱ्या नुकसानाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही त्यामुळे देशातील सर्व डीलर चे सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान झाले त्याची दखल शासनाने घ्यावी. दिनांक 16 जुन 2017 पासून देशात लागू केलेली दैनंदिन किंमत बदल(DPC) ह्या धोरणाचा वापर ग्राहकांना फायदा पोहचण्यापेक्षा पेट्रोलियम कंपनी त्यांचे सोयीप्रमाणे त्याचा वापर करत असल्याने ती पद्धत बदलण्यात यावी.या सर्व बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी आजचे लक्षवेधी खरेदी बंद आंदोलन नाशिक मध्ये यशस्वी झालेले आहे .यात ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता असोसिएशन मार्फत घेण्यात आली. सदर आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष श्री भूषण भोसले, माजी अध्यक्ष श्री नितिन धात्रक, उपाध्यक्ष साहेबराव महाले, सचिव सुदर्शन पाटील, सदस्य तेहसीन खान, दिनेश धात्रक,हेमचंद्र मोरे , सुजय खैरनार,डी व्ही शहा,संजय कोठुळे, विनोद बनकर,राकेश जगताप,तुषार मरसाळे, चिनुभाई शहा, संजय धोंगडे,प्रवीण महाजन पंकज कोकाटे भारत टाकेकर, शरद गुंजाळ झिया जारीवला निलेश लोंढा मोहित नानावटी अमोल शिंदे सूरज पवार
सर्व डीलर नाशिक ,धुळे व नंदुरबार येथून उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.