मनमाड शहर भाजपच्या वतीने केंद्रा तील नरेंद्र मोदी सरकार च्या आठ वर्षे पूर्ती निमित्ताने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण जन संपर्क अभियाना ची सुरुवात तसेच राजमाता कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे २९७ व्या जयंतीनिमित्त भाजपा तर्फे अभिवादन करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या केंद्र सरकारला 26 मे 2022 रोजी आठ वर्षे पूर्ण झाली या अष्टवर्ष पूर्ती चे औचित्य साधत भाजपने संपूर्ण देशात दिनांक 01 जून ते 14 जून या पंधरवड्यात सेवा सुशासन व गरीब कल्याण जन संपर्क अभियान आयोजित केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला हिमाचल प्रदेश येथे गरीब कल्याण संमेलन मध्ये पी एम किसान सन्मान निधी च्या 11 व्या हप्ता चे 21000 कोटी देशातील सुमारे 10.50 कोटी शेतकऱ्यांनच्या खात्यात थेट ऑनलाईन जमा करीत या राष्ट्रीय अभियान चा शुभारंभ केला.मनमाड शहरात ही स्वातंत्र्य वीर सावरकर नगर येथे भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या या जनसंपर्क अभियान चा आरंभ करण्यात आला पुढील 15 दिवसात भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांन च्या माध्यमातून मनमाड शहरातील शेतकरी ,महिला, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी ,समाजातील वंचित घटक ,युवा,समाजातील प्रतिष्ठित मान्यवर यांचे शी थेट संपर्क साधून मोदी सरकारने केलेले कार्य जनते पर्यन्त पोहचवणार असल्याचे शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी या प्रसंगी सांगितले याच वेळो मनमाड शहर भाजपचे वतीने राजमाता कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर यांचे २९७ व्या जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा चिटणीस मकरंद कुलकर्णी यांचे हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी स्वर्गीय अहिल्याबाई याचे लोककल्याणकारी सेवा कार्याची माहिती विशद केली कार्यक्रम चे सूत्र संचालन भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले या कार्यक्रमाला भाजपा शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे अल्पसंख्याक मोर्चा प्रमुख जलील अन्सारी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे,भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन ,नारायण जगताप, मयूर माळी, अमित सोनवणे, सचिन हिरालाल लुणावत भाजपा दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दिपक पगारे,सुमेर मिसर,ओबीसी आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद सानप, धीरज भाबड आदी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांन सह भाजप कार्यकर्ते हितचिंतक सावरकर नगर मधील रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजप मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी अनंता भामरे यांनी केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











