लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन शिवसेना नगरसेविका किरणताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जि. उपप्रमुख संतोष भाऊ बळीत, शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे युवा सेनेचे मुन्नाभाऊ दरगुडे, युवा सेना शहरप्रमुख आमीनभाई पटेल, ललित रसाळ, सचिन दरगुडे, जितेंद्र ताथेड, महेंद्र गरुड, नंदू पीठे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करून पेढे वाटप करण्यात आले.
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...










