loader image
[ays_poll id=7]

१२५ जेष्ठ नागरिकांचा झाला वाढदिवस साजरा

Jun 1, 2022


सटाणा (अजय सोनवणे) गावातील तब्बल 125 जेष्ठ नागरिकांचा झाला वाढदिवस साजरा.सटाणा तालुक्यातील आराई गावातील आगळा-वेगळा उपक्रम वाढदिवस साजरा करणारे महाराष्ट्रातील आराई एकमेव गाव
युवकांना अनेक

नवनवीन कल्पना सुचत असतात .अशीच एक सामाजीकबांधिलकी जपणारी चांगली कल्पना आणि एक आदर्शवत कार्यक्रम बागलाण तालुक्यातील आराई येथील तरुण युवक व सामाजिक कार्यकर्ते अश्विन अहिरे यांच्या संकल्पनेतून साकार केला गेला नाशिक जिल्ह्यात आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून तालुक्यात चर्चेचा विषय बनला. एक जून हा सर्वात जास्त वाढदिवस साजरा होणारा दिवस म्हणून असतो, या दिवशी प्रत्येक गावी तरुण आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करतात 25 नागरिकांचा वाढदिवस कोणीच साजरा करताना दिसत नाही, तरुण युवकांच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक आहेत असा भव्य दिव्य कार्यक्रम गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून अनोख्या पद्धतीने
१२५ मोठ्या लोकांचा एकच वाढदिवस साजरा करत त्यांचा आनंदात भर घातली जुनी जन्मतारीख बर्‍याच लोकांची असल्याने येथील अश्विन अहिरे यांनी 51 वर्षांपुढील नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना असूनया संकल्पनेतून कोणत्याच प्रकारचे राजकारण भेदभाव न करता नागरिकांना मदत करून सर्वांना फेटा घालून व आराई गावाच्या प्रवेशापासून ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत त्याचे स्वागत करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, छत्रपती शिवाजीमहाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व भव्य मंडपात सर्व जेष्ठ नागरिकाचे औक्षण करण्यात आले या कार्यक्रमास गावातील तरूण सुध्धा मोठ्या उत्सवाने सामील झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दहा किलोचा केक कापून मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला,कसमादे परीसरात इतक्या मोठ्या प्रमाणात आराई गावातील १२५ ज्येष्ठ नागरीकाचा वाढदिवस साजरा झाल्याची चर्चा सर्वत्र होत असुन आराई येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन आहिरे याचे कौतुक देखील होत आहे या कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता आजपर्यंत आमचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही पन आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वाढदिवस साजरा झाला अशा भावना काहीनी बोलुन दाखवल्या, या संकल्पनेचा ज्येष्ठ नागरिक गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.