कांद्याला हमीभाव मिळावा व इतर मागण्यांसाठी आज चांदवड येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांतर्फे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर चांदवड-मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सध्या उन्हाळी कांद्याचे दर पडल्याने शेतक-यांचा लागवडीचा खर्च सुध्दा वसूल होत नसून कांद्याला ३हजार रुपये हमीभाव व ५००रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळावे,खतांचे भाव कमी करावे,पेट्रेल-डिझेलचे भाव कमीकरावे,गव्हाची निर्यात पुन्हा सुरु करावी,सोयाबिनची आयात बंद करुन निर्यात सुरु करावी,कांदा चाळीला दिड लाखाचे अनुदान देण्यात यावे यासह अशा विविध मागण्यांसाठी हे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











