loader image
[ays_poll id=7]

बिबट्या सदृश प्राण्याचा दोन विद्यार्थ्यांवर हल्ला ; न्यायडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण

Jun 4, 2022


नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील महसुल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वनक्षेत्रामध्ये बिबट्या सद्श हिंसक प्राण्याने दोन शालेय विध्यार्थी यांच्यावर हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वृत असे की न्यायडोंगरी येथील वन क्षेत्रातून वाहणाऱ्या मन्याड नदी पात्रात “वीज कडक्या ” नावाने ओळखला जंगलाचा भाग असून या ठिकाणी अदिवासी समाजाचा नवस पुर्तीचा कार्यक्रम सुरू असतानां महेश ठाकरे (वय ११) कृष्णा ठाकरे (वय १३) दोघे राहणार (गवळीवाडा) न्यायडोंगरी हे मुले नदीत खेळत असतानां कपारीत दबा धरूण बसलेल्या हिंसक प्राण्याने (बिबटया सद्श) अचानक हल्ला करून जखमी केले . यावेळी जवळ असलेल्या जमावाने आरडाओरड केल्याने सदर प्राण्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकल्याने ही मुले थोडक्यात बचावली.
सदर जखमी मुलांना न्यायडोंगरी येथील डॉ. योगेश राठोड यांच्या खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल केले असून पुढील उपचार सुरू आहे. न्यायडोंगरी विभागात सदर घटनेने भितीचे वातावरण तयार झाले असून सदर हिंस्त्र प्राण्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.