नांदगाव विधानसभा मतदारसंघातील रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या प्रत्येक कुटुंबास घरपोच रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम गेल्या दोन वर्षांपासून चालू असून आज नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. हिरेनगर येथील जवळपास साठ आदिवासी कुटुंबांजवळ आजपर्यंत रेशन कार्ड नव्हते, आज हिरेनगर येथे लाभार्थी कुटुंबीयांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले. याप्रसंगी माजी उपसभापती राजाभाऊ देशमुख, संघटक भाऊराव बागुल, युवासेना तालुका कार्याध्यक्ष वाल्मीक निकम तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











