मनमाड : श्री दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या श्री श्रीफळ धुनीचा 20 वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला , या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे दिडशे-दोनशे वर्षांपुर्वी कै.श्री गोपाळदास महाराज आयोद्धा निवासी यांचे शिष्य कै. श्री सीताराम बैरागी महाराज यांनी श्रीमंत जहागीरदार विंचुरकर यांच्याकडुन जमिन दान घेऊन श्री गुरुदेव दत्त मंदिर , मठ , धर्मशाळा , विहीर आणि धुनीची स्थापना केली होती. बदलत्या काळा नुसार स्थापन केलेली धुनीची जागा ही लोप होऊन गेली होती , मंदिराचे मालक श्री सुनील बाबा कानडे(सीताराम बाबा) यांनी पुर्वी ज्या जागेत धुनी होती त्या जागेचे उत्खनन करून तेव्हाच्या त्या धुनीचे अवषेश आणि राख सापडून आल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्व योग साधुन दिनांक 1 मार्च 2003 रोजी महाशिवरात्री निमित्त महंत श्री उदयगिरी महाराज नागा संन्यासी यांच्या हस्ते श्रीफळ धुनी पुन्हा प्रज्वलित केली आणि सव्वा वर्ष अखंड नारळ होम करुन दिनांक 3 जुन 2004 रोजी साधु-संतांच्या उपस्थिती मध्ये श्रीफळ होमची पुर्णाहुती केली . तेव्हापासून आजपर्यंत अखंड वीस वर्ष श्री श्रीफळ धुनी लाकडावर प्रज्वलित आहे.
यंदाच्या वर्षी श्रीफळ धुनीच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या 2 ते 4 जुन पर्यंत होम , हवन , याग , सत्यनारायण पुजा , महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन श्री सीताराम बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते , या सर्व धार्मिक कार्यक्रमाला साधु-महंत , भाविक-भक्त आणि नागरिक उपस्थित होते.












