loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येवला रोडचे काम अपूर्णावस्थेत ; रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

Jun 5, 2022



नांदगाव येवला रोड नुतणीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवल्याने वाहतुकीचे प्रंचड हाल होत असून वाहनचालक तथा सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. याबाबत वृत असे की नांदगाव येवला रोड वर मोठया प्रमाणात खड्डे झालेले असून वाहतुकीचे प्रचंड हाल होत आहे . या रस्त्याबाबत आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले व विवेकानंद नगर चे माजी नगरसेवक यशवंत शिदें यांनी नुकतेच आसुड आंदोलन केले होते . त्यावेळी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ मार्च पर्यंत सर्व कामे पुर्ण होतील असे आश्वासन दिले होते. पंधरा दिवसांपुर्वी मल्हारवाडी ते मार्क कमेटी पर्यंत काम सुरू झाले पंरतू रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी चे काम न करता जुना डांबरी रस्ता न खोदता त्यावर खडी टाकून डांबर टाकण्यात येत आहे रस्त्याच्या एक पट्टीवर डांबर टाकण्यात आले तर दुसरी पट्टी तशीच ठेवून १० दिवसापासून काम बंद करण्यात आले. रस्त्यावर अर्थवट डांबर अर्धवट खडी अशा अवस्थेत काम बंद केले आहे. याबाबत माजी नगरसेवक यशवंत शिदें यांनी सोशल मिडीया द्वारे आंदोलनाचा इशारा दिला . रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी नसल्याने पावसाळयात रस्त्याचे पाणी बाजार समितीच्या कॉम्पलेक्स मधील दुकानात घुसण्याची दाट शक्यता आहे .याबाबत रेल्वे गेट ते बेलदार वाडी येथील रहिवाशी लवकरच जनआंदोलन करणार पुकारणार असल्याचे शिदें यांनी सांगितले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.