मनमाड : येथील आश्विनी नगर गुजराथी मळा परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे विद्युत पोल वरील तुटलेल्या तारेमुळे मीराबाई सुरेश गिडगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्या विजेच्या धक्याने मृत पावल्या.काल सायंकाळी मनमाड परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला, या मुळे काही ठिकाणी नागरिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असुन , अश्विनी नगर येथील परिसरामध्ये तुटलेल्या विद्युत तारेमुळे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला , परीसरातील काही नागरिकांनी सांगितले की त्यांनी या कमकुवत झालेल्या विद्युत तारे बाबत अनेक वेळेला मनमाड येथील एम.एस.इ.बी.च्या कर्मचाऱ्यांना माहीती देऊन देखील त्या कडे त्यांनी दुर्लक्ष केले.महावितरण च्या गलथान कारभारामुळे आज ह्या दोन शेळ्यांना जीव गमवावा लागल्याचाया आरोप ही परिसरातील नागरिकांनी केला असून आता तरी महावितरण ने जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा बदलाव्या अशी मागणी होत आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











