आज मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मनमाड शहरात दमदार हजेरी देत वातावरणातील उष्णता काही अंशी कमी केली.वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने मात्र मनमाडकर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.विजेच्या कडकडटाट आणि वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे छप्पर आणि पत्र्याच्या शेड चे नुकसान झाले.अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली. मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक वर्गाचे पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली.















