loader image
[ays_poll id=7]

बारावीच्या निकालात सर्व विभागात मुलींची बाजी : छत्रे हायस्कूल ची साक्षी चौधरी केंद्रात प्रथम

Jun 8, 2022


शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मार्च,एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला असून या निकालात मनमाड शहरातील छत्रे हायस्कूल, इंडियन हायस्कूल, एच ए के हायस्कूल तसेच मनमाड महाविद्यालयातील सर्वच विभागांत मुलींनी प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली. छत्रे हायस्कूल चा निकाल ९८.४६% टक्के लागला असून मनमाड केंद्रात प्रथम येण्याचा मान ही छत्रे हायस्कूल च्या चौधरी साक्षी प्रवीण ह्या विद्यार्थिनीने (५४२) ९०.३३% गुण मिळवले.तर शाळेतील उर्वरित गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे चंद्रात्रे ज्ञानेश्वरी हरीश (५२५) ८७.५०%, अग्रवाल साक्षी गोविंद (५२४) ८७.३३%, मुथा राशी अमरचंद (५२३) ८७.१७%, साखरे राशी जेम (५२२) ८७%. तसेच इंडियन हायस्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान गंगीले सृष्टि यशपाल ८७.३३%, सप्रे प्रथा विक्रम ८६.८३%, भार्गवी चंद्रकांत ८५.८३%

एच ए के ज्युनिअर कॉलेज मध्ये विज्ञान विभागात मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर श्री प्रवीण शिंगी यांची सुकन्या निर्जरा प्रविन शिंगी हिने ८७.३३% गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला,खान हुझैफा शकील द्वितीय ८७%, तृतीय खत्री लोचन राजबहादुर ८५.३३%. तसेच कला शाखेत हाजरा फिरदौस मोहम्मद चांद पाशा प्रथम ७८%, राठोड हबीबा इर्शाद द्वितीय ७७.८३%, अन्सारी नूरहसन जाहीद तृतीय ७६.३३%

चौधरी साक्षी प्रवीण
चंद्रात्रे ज्ञानेश्वरी हरीश
अग्रवाल साक्षी गोविंद

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.