loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात महेश नवमी उत्साहात साजरी

Jun 9, 2022


नांदगाव शहरात माहेश्वरी समाजा कडून महेश नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत वृत असे की माहेश्वरी समाजा कडून महेश नवमी (माहेश्वरी उत्पत्ती दिन ) मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी तालुक्याचे आमदार सुहास कांदे व अंजूम कांदे यांनी शुभेच्या दिल्या . महेश नवमीचे माहेश्वरी समाजात मोठे महत्व आहे . या दिवशी भगवान शंकराची व माता पार्वतीची विधीवत पुजा केली जाते. जेष्ट महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी म्हणजेच महेश नवमी. शहरातील प्रसिद्व कांदा व्यापारी भुषण धुत यांनी श्रीराम मंदीरात सपत्नीक विधीवत पुजा केली. समाजा कडून महादेवाच्या मुखवटयाची गांधी चौक ‘ महात्मा फुले चौक ‘ कालीका माता चौक ‘ छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘ बालाजी चौक ‘ या प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी केशरी रंगाच्या साड्या परिधान करण्यात आल्या होत्या. मिरवणूकीची सांगता श्रीराम मंदीरात आरती व महाप्रसादाने झाली.
मिरवणुकी नंतर ओसवाल भुवन येथे समाजाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५० समाज बांधवानी रक्तदान केले.यावेळी माहेश्वरी समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.