loader image
[ays_poll id=7]

१५ जून पासून वाजणार शाळेच्या घंटा !

Jun 10, 2022

नवीन शैक्षणिक वर्ष १३ जून रोजी की १५ जून रोजी सुरू होणार याबद्दल सर्वांच्याच मनात संभ्रमावस्था होती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून त स्पष्ट करण्यात आले असून राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी १३ जूनपासून शैक्षणिक वर्ष शाळांनी सुरु करावे तर १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना या सूचना दिल्या आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन २७ जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

येत्या १३ व १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन आदींचे आयोजन करावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत २४ ते २५ जून रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन २७ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असतानाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील तसेच शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.