loader image
[ays_poll id=7]

१३ जूनला जाहीर होणार नगरपालिका वॉर्ड आरक्षण तेही ओबीसी आरक्षणाशिवाय !

Jun 10, 2022

महापालिकांपाठोपाठ आता राज्यातील २१६ नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील वॉर्डांचे आरक्षण हे ओबीसी आरक्षणाशिवायच करण्यात येईल यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १३ जूनला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यावर १५ ते २१ जून दरम्यान हरकती व सूचना दाखल करू शकता.

२०८ नगरपालिका व आठ नगरपंचायतींच्या अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी आज नोटीस प्रसिद्ध करतील. विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील व तद्नंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. राज्य सरकारने स्थापन केलेला समर्पित आयोग ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करीत आहे. तो सर्वोच्च न्यायालयात सादर करून त्या आधारे ओबीसींना पुन्हा आरक्षण बहाल करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.