loader image
[ays_poll id=7]

प्रा. नितीन लालसरे यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक मंडळावर निवड.

Jun 10, 2022


मनमाड (योगेश म्हस्के) : अत्यंत कमी वयामध्ये आपल्या आयुष्यातील यशाची अनेक शिखर सर केलेले मनमाड शहराचे भूमिपुत्र प्रा. श्री नितीन लालसरे यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘आदिवासी अभ्यासक्रम’ (Tribal Studies) या विषयाच्या अभ्यासक मंडळावर नुकतीच निवड झाली आहे.

प्रा. श्री नितीन लालसरे हे आपल्या जीवनातील अनेक संकटांचा सामना करून अत्यंत कमी वयामध्ये या पदापर्यंत पोहचले आहे , ‘आदिवासी अभ्यासक्रम’ (Tribal Studies) हा विषय कला शाखेमध्ये शिकवला जात असुन यामध्ये आदिवासी समाजातील जन-जाती , रूढी-परंपरा , जीवनमान या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. प्रा. श्री नितीन लालसरे हे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असुन गेल्या आठ वर्षांपासून ते नामदार मंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन देखील कार्यरत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अत्यंत जबाबदारीच्या असणाऱ्या अभ्यासक मंडळावर निवड होण्यासाठी प्रा. लालसरे यांना बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ.श्री सुधीर निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले , नामदार मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रा.श्री नितीन लालसरे यांचे विशेष अभिनंदन केले असुन , समाजातील सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मनमाड न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.