loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !       

Jun 10, 2022


  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहर शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज आपापल्या घरावर लावून वर्धापन दिनास सुरुवात केली.इयत्ता १२ वी च्या परीक्षेत मनमाड शहरातील विविध शाखेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून उचित गौरव करण्यात आला. सायंकाळी शहरातील पाकिझा कॉर्नर येथून रॅली काढून सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजुभाऊ पाटील,मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड,कार्याध्यक्ष नाना शिंदे,सेवादल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, अ.स.तालुका अध्यक्ष हबीब शेख, महिला शहराध्यक्षा अपर्णा देशमुख, मा.उपनगराध्यक्ष प्रकाश बोधक,जावेद शेख, आनंद बोथरा, श्रीराम कातकडे, फिरोझ शाह,पवन अहिरे, रुबिना शाह, माया झालटे,कोमल नीकाले,तावडे ताई,प्रियांका बोथरा, श्रद्धा अहिरे, गण प्रमुख राजेंद्र निकम,उमेश जेजूरकर यांसह राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.