चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निकमध्ये अध्ययन करत असलेल्या मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील ८३, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनियरिंग विभागातील १६,संगणक इंजिनियरिंग विभागातील ११, सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील १ व ड्रेस डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंग विभागातील ७ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकीत कंपन्यांत करण्यात आली. मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड, पुणे ( ४१ विद्यार्थी), जिंदाल सॉ प्रा. लिमिटेड सिन्नर, नाशिक ( ६ विद्यार्थी), मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नोलोजी आणि इंजिनियरिंग प्रा. लिमिटेड, पुणे(८ विद्यार्थी ), करारो इंडिया प्रा. लिमिटेड (इटालियन मल्टीनॅशनल), पुणे (३विद्यार्थी) , पॅरास्कॅड प्रा. लिमिटेड,मुंबई (३ विद्यार्थी), रिंगप्लस अॅक्वा प्रा. लिमिटेड सिन्नर, नाशिक (१२ विद्यार्थी),निप्पॉन स्टील, पुणे (३ विद्यार्थी ), एपिरॉक प्रा. लिमिटेड ,नाशिक ( ५विद्यार्थी) , मेमको इंजी. प्रा. लिमिटेड ,नाशिक(१विद्यार्थी ) व प्राइम ग्रेफाइट प्रा. लिमिटेड, नाशिक ( १ विद्यार्थी ), नमुद नामांकीत कंपन्यांत निवड करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड ,पुणे (१० विद्यार्थी), रिंगप्लस अॅक्वा प्रा. लिमिटेड सिन्नर, नाशिक (६ विद्यार्थी) मध्ये निवड करण्यात आली. संगणक इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांची सुनंधा इन्फोटेक प्रा. लिमिटेड, नाशिक (६ विद्यार्थी) डी .एक्स. सी. टेक्नोलोजी, हैदराबाद (४विद्यार्थी), जिओ डिजिटल लाइफ,गुजरात ( १विद्यार्थी) मध्ये निवड करण्यात आली. सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांची आर. डी. सी. काँक्रीट प्रा. लिमिटेड, मुंबई(१विद्यार्थी) मध्ये निवड करण्यात आली. ड्रेस डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंग विभागातील विद्यार्थ्यांची चरण इंडस्ट्रीज, नाशिक ( ७ विद्यार्थी ) मध्ये निवड करण्यात आली. या कामगिरीचे श्रेय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, तंत्रनिकेतनचे टीपीओ श्री वाय. एल. काकुस्ते,
समन्वयक सौ.आर.आर.सोनवणे,सौ. एस.एन.गोसावी,श्री.जी.ए.अरखडे,श्री.जी.जे.पगार,सौ.के.एस.सोनवणे,सौ.यू.एस. काळे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांस जाते. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या बद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.












