नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) शहरातील बहुचर्चीत रेल्वे सबवे मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक महिना वाहतुकीस बंद होता . मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागाच्या तांत्रीक विभागाने सब वे लगत असलेले मटन मार्केट चे अतिक्रमण काढले तर रेल्वे विभाग सबवे मध्ये पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करेल असे नगरपालिकेस सांगितले होते . त्यानुसार नगरपालिकेने मटन मार्केटचे अतिक्रमण पाडले पंरतू रेल्वे अधिकाऱ्यांनी काहीही न केल्यामुळे आज पावसाच्या पहिल्या पाण्यातच सबवे मध्ये पाणी साचून पायी वाहतूक काही काळ बंद झाली होती.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तांत्रीक विभागाने यावर त्वरीत मार्ग काढावा अशी मागणी नागरीक करीत आहे.
आज शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला . पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाने सुखावला असून शेतीच्या कामाची लगबग सुरु होईल .
सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम...











