loader image
[ays_poll id=7]

गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन

Jun 11, 2022


मनमाड : श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये धन धन श्री गुरू हरगोबिंद साहेबजी यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने विशेष गुरुमती समागम सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले.शनिवार दिनांक 11 आणि रविवार 12 जुन दरम्यान गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला विशेष गुरुमती समागमचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सुंदर अशी सजावट करण्यात आली असुन , अखंड पाठ , भजन, कीर्तन ,प्रवचन , लंगर आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले आहे.

गुरुद्वारामधील धन धन श्री गुरू हरगोबिंद साहेबजी यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने आयोजित सालाना जोडमेला विशेष गुरुमती समागमाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा श्री रणजीत सिंहजी यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.