भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा मनमाड शहर नासिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. २८ में रोजी टाइम्स नाउ या इंग्रजी चेनेल वर ज्ञानवापी फ़ाइल या चर्चेच्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा या महिलेने चर्चे दरम्यान अत्यंत खालच्या दर्जेवर जाऊन प्रेषित व त्यांच्या पत्नी यांचे बद्दल बदनामीकारक खोटे व वादग्रस्त विधान करून त्यांच्या पवित्र व आदर्श चरित्र्यावर शिंतोड़े उड़वुन सर्व मुस्लिम धर्मीयांचे धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर भा.द.वि.कलम २९५ (अ),१५३(अ),५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन मनमाड शहर पोलिस ठाणे व मंडल अधिकारी यांना देण्यात आला. त्या प्रसंगी समितीचे जिल्हा अध्यक्ष सादिक़ पठान, जिल्हा संपर्क प्रमुख अल्ताफ शाह,जिल्हा संघटक मोहसिन शेख, शहराध्यक्ष बाबा पठान,अकील शेख, इमरान पठान,जाविद मन्सूरी,वसीम सय्यद,समीर खान,सईद (दादा) शेख, इम्तियाज शेख,जाविद शाह, राजू शाह, इसरार शेख, तौफीक खान, व ईतर पधाधिकारी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











